पोस्ट्स

नवरात्रीचे नऊ रंग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

जाणून घ्या अक्षय तृतीया बद्दल संपूर्ण माहिती...

इमेज
🚩🚩 जाणून घ्या अक्षय तृतीयाबद्दल संपूर्ण माहिती 🚩🚩 अक्षय तृतीया  कधी आहे अक्षय तृतीया, या दिवशी सोने खरेदी करणे का मानलं जातं शुभ, जाणून घ्या अक्षय तृतीयेची पौराणिक कहाणी      हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी बरीच शुभ कामे केली जातात. हिंदू पंचगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी साजरी केली जाते.  हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी बरीच शुभ कामे केली जातात. हिंदू पंचगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी साजरी केली जाते. या दिवशी दान-पुण्य करण्याचे विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विवाह, गृह प्रवेश, धार्मिक विधी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असा विश्वास आहे की या दिवशी सोने खरेदी केल्याने प्रगती होते. यावेळी अक्षय तृतीया 30  एप्रिल 2025 रोजी आहे . चला या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया –   महत्त्व  अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलं जाते. या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात. या दि...

श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आणि माहिती

इमेज
श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आणि माहिती उत्सवाची परंपरा:- चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात..  श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन,कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन...

गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व...

इमेज
  गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व...!!! गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभता पासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे.    आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते.    गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्ये करणे शुभ असते.  पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो.    साधकासाठी फायदे...

संपुर्ण माहीत पंढरीच्या वारीची...

इमेज
  संपुर्ण माहीत पंढरीच्या वारीची... संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या विठ्ठला ची आज कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशी निमित्त आज मी तुम्हाच्या साठी पंढरीची वारी ची माहिती घेसंपुर्ण माहीत पंठरी च्या वारी ची..ऊन आलो आहे पंढरीची वारी  वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार.  पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे.  वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते. अनेक भक्त एकत्र ये...

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

Dussehra SMS in English

इमेज
  Dussehra SMS in English Soneri Kirane… Soneri Kiranancha…. Soneri Diwas…. Soneri Diwasachya… Soneri Shubhechchha…. Keval…. Sonyasarkhya Lokanna….! Happy Dasara….! Dussehra leaf Marathi Asmitechi Mrathi shan “Marathi parmprecha marathi man” Aaj sonyasarkha diwas gheun yeyil aayushya tumchya sukh aani samudhi “Happy Dassehra,”

दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती भाग ३.

इमेज
 सहावा दिवस - रंग हिरवा                          परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायिनी. लाल रंगाशी जोडलेली असली तरीही या देवीचा आवडता रंग हिरवा समजण्यात येतो. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध या देवीने केला होता त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही नाव आहे. कालिका पुराणात ओडिसामध्ये कात्यायनी आणि भगवान जगन्नाथ यांचे स्थान सांगण्यात आले आहे. आज्ञा चक्र या दिवशी स्थित होत असून योगसाधनेत याचे महत्त्व आहे. अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती, समाधान मिळवून देण्यासाठी या देवीची महिला पूजाअर्चा करतात. त्यामुळेच हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाशी जास्त संबंधित मानला जातो.बुधाचा रंग हा हिरवा आहे. त्याचे रत्न पाचू हे देखिल हिरव्या रंगाचे आहे. म्हणून या दिवशी हिरवे वस्त्र वापरावे. बुध हा आपल्या बुद्धिचा कारक आहे तसेच तो आपल्या मामाचे...

दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती भाग 2

इमेज
तिसरा दिवस - रंग लाल   चंद्रघंटा देवीचा हा रंग मानण्यात आला आहे.या दिवशी विग्रह पूजन आणि आराधना करण्यात येते. मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होण्यासाठी भक्त या देवीची आराधना करतात. देवी चंद्रघंटेच्या कृपेने अलौलिक शक्तीचे दर्शन मिळते, तसेच दिव्यदृष्टींचा अनुभव घेता येतो असे सांगण्यात येते. या देवीची पूजाअर्चा करताना दिव्य ध्वनी ऐकायला येतात असंही सांगितलं जातं. या देवीचा आवडता रंग आहे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तीरसात राहण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व जाणलं जातं. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या तिसऱ्या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं. या देवीच्या कपाळाचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे असल्यामुळेच या देवीला चंद्रघंटा देवी नावाने ओळखलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या देवीला हा रंग प्रिय असल्याचे समजण्यात येते.  चौथा  दिवस - रंग रॉयल ब्लू अर्थात गडद निळा  चौथे रूप- कुष्मांडा. जीला गडद निळा रंग जवळचा आहे म्हणून चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्र घालावीत. दुष्कर्म करणाऱ्या आणि राक्षसी शक्तीचा नाश कर...

दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती भाग १ | नवरात्रीचे रंग २०२६: दिवसानुसार तारखा, तिथी, देवींची नावे आणि रंग

इमेज
नवरात्रीचे रंग २०२६: दिवसानुसार तारखा, तिथी, देवींची नावे आणि रंग  दिवस पहिला - रंग नारिंगी अर्थात भगवा    हा दिवस शैलपुत्री देवीचा मानण्यात येतो. जे दुर्गाचे पहिले रूप आहे. पर्वतराज हिमालयच्या पोटी जन्म घेतला म्हणून शैलपुत्री असे नाव ठेवण्यात आले.या देवीचा आवडता रंग नारिंगी आणि जास्वंदीचे फूल प्रिय आहे. त्यामुळे नारिंगी व भगवा रंग परिधान केल्याने शैलपुत्री प्रसन्न होते असा समज आहे. शैलपुत्री देवी भाग्य उजळवते असं म्हटलं जातं. त्यामुळे या पहिल्या दिवशी तिची पूजाअर्चा करून तिला तिचे भक्त प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. केशरी रंग हा उगवत्या सुर्याचा आहे. सूर्य हा उर्जेचा दाता आहे. तसेच तो आपल्या पित्याचे रक्षण करतो. तसेच सुर्याचा अधिकार आपल्या ह्रदयावर असतो. या दिवशी हा रंग वापरल्यास मानुस सामर्थ्यवान बनतो व हृदयपिडेचा धोका कमी होतो. दुसरा  दिवस - रंग पांढरा अर्थात सफेद हा दिवस ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. तपस्या आचरणात आणणारी ही देवी असल्याने या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्या करावी ल...

नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व 2026

इमेज
       नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व    दुर्गेची नऊ रूपं अर्थात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि सिद्धीत्री यांची या दिवसात पूजाअर्चा करण्यात येते. या देवींना आवडणाऱ्या रंगांवरून नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांचे महत्त्व ठरलेले आहे. पण बरेचदा वारानुसारही रंगाची निवड करण्यात येते. *उदाहरणार्थ सात वार अनुसार रंग तसेच इतर मोरपिशी, जांभळा, आकाशी, गुलाबी. सोमवार २६ सप्टेंबर २०२२ पहिली माळ , पांढरा रंग. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे. मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ दुसरी माळ, लाल रंग. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. बुधवार २८ सप्टेंबर २०२२ तिसरी माळ, निळा रंग . तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे. गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ चौथी माळ, पिवळा रंग. चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग भक्त...