टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...
● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.
● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.
● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.
● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते.
● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.
● आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
● कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आजार वाढू शकतो.
● आंब्याचे अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
● आंब्याला पिकवण्यासाठीअनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो.
● आंब्यात जवळपास 150 कॅलरीज असतात. जास्त कॅलरी खाल्ल्यास वजन वाढू शकते.
● ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
● आंबा हे गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️