नवीन पोस्ट..

टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

इमेज
टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ? पोस्टल पत्त्यांचे आकर्षण असलेल्या पिन कोडचा काळ आता संपला आहे आणि भारतीय टपाल विभागाने पर्याय म्हणून 'डिजिपिन' नावाचा डिजिटल पत्ता सादर केला आहे. आतापासून देशातील नवीन पत्ता प्रणाली म्हणजे डिजिपिन. पारंपारिक पिन कोड विस्तृत क्षेत्र व्यापतात, तर १०-अंकी डिजिपिन प्रणाली तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान दर्शवते. पिन कोड आणि डिजिपिनमधील फरक काय आहेत ते जाणून घेऊया. भारतीय टपाल विभागाने अचूक स्थान समजून घेण्यासाठी DIGIPIN प्रणाली सुरू केली आहे. DigiPIN मध्ये 10-अंकी डिजिटल कोड आहे. पारंपारिक पिन कोडऐवजी, जो विस्तृत क्षेत्र व्यापतो, DigiPIN अचूक स्थान माहिती प्रदान करेल. म्हणजेच, या DigiPIN द्वारे तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान शोधता येते. DigiPIN तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सरकारी वेबसाइटला भेट देऊन आणि कोड शोधून तुम्ही तुमचे घर शोधू शकता. DigiPIN चा फायदा असा आहे की ते योग्य ठिकाणी पत्रव्यवहार पोहोचवेल आणि रुग्णवाहिका आणि अग्निशमन विभागांसारख्या आपत्कालीन सेवांना स्थान समजून अचूकपणे पोहोचण्या...

श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आणि माहिती


श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आणि माहिती



Tradition and information of Shri Ram Navami festival

उत्सवाची परंपरा:-

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात.


त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. 

श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.


रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन,कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम ह सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

कफ व खोकला यावरील उपाय.