पोस्ट्स

मराठी सण आणि उत्सव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

बैलपोळा.

इमेज
 बैलपोळा बैलपोळा श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात.  या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “  सण येतो . शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2022 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2022 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय . खरं म्हणजे सर्व जगाचे पोट ज्या बळीराजावर अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो .  वर्षभर शेतीकामाला मदतनीस म्हणून उभा राहणारा शेतकऱ्या बरोबर राहणारा सर्जा – राजा ( बैल )  याच्या विना शेतकऱ्यांचे काम पूर्ण होत नाही अशा या रिंगी – शिंगी ,  ढवळा – पवळा , सर्जा- राजा व अशी प्रेमाने  बरीचशी ठेवलेली नावे  बैलाची असतात . अशा या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण वर्षातून एकदा येतो. व शेतकरी राजा हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरी करतो . बैलपोळा सण कसा साजरा करतात  ? | व बैल पोळा सजावट ? पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी ब...

वटपौर्णिमा उत्सव आणि परंपरा

इमेज
  वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा - वटसावित्री व्रत  वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा माहिती :- वटपूजनाच्या दिवशी सूर्योदयापासून मध्याह्नापर्यंत म्हणजे सुमारे दुपारी 1.30 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे. तसेच हे सौभाग्यव्रत असून त्याच्या संकल्पात सात जन्म हाच पती मिळावा असा संकल्प नाही. सौभाग्य याचा अर्थ पति, धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य, पुत्रपौत्र इ. असावे असा आहे. वटवृक्षाची पूजा करावी असे आहे. त्या वृक्षाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा करू नये. वडाच्या चित्राची किंवा गंधाने वडाचे झाड काढून सुद्धा पूजा करता येईल. गरोदर स्त्रीचे स्वास्थ्य ठीक असेल तर ९ व्या महिन्यापर्यंत वटपूजन करू शकते. वड, पिंपळ, औदुंबर, शमी हे यज्ञीय व पवित्र वृक्ष म्हणून सांगितले आहेत. यांच्या पूजनाने आपण निसर्गाच्या जवळ जात असतो. झाडे लावणे जितके महत्त्वाचे त्यापेक्षा त्यांची जोपासना करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. हा संदेश सध्याच्या काळाच्या दृष्टीने या व्रतातून मिळतो. सर्व वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त आहे. पारंब्यांनी त्याचा विस्तारहि खूप होतो. अशा वटवृक्षात असणाऱ्या ब्रह्मासावित्री या देवतांचे पूजन कर...

श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आणि माहिती

इमेज
श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आणि माहिती उत्सवाची परंपरा:- चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात..  श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन,कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन...

होलिका दहनाचे कथा आणि महत्व | The story and significance of Holika Dahan | Happy Holi 2022 Festival

इमेज
               होलिका दहनाचे  कथा आणि  महत्व The story and significance of Holika Dahan होळीची कथा :-             आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. वर्षभर ज्याची वाट पहात असतात, ती पळसफुले सर्वत्र बहरलीत. जीवनात वसंत वाढविणारी आज होळी पौर्णिमा आली.          राजा हिरण्यकश्यपू. हिरण्य म्हणजे सोने. सोन्याच्या.. भोगाच्या.. सुखाच्या मागे लागलेला हा भोगवादी राजा. त्याने राक्षसी वृत्तीने सर्व सज्जन भगवंत भक्ताना वेठीस धरले. भगवंताचे नावही कुणी उच्चारले तर तो जीव घेऊ लागला. पण पुत्र प्रल्हाद होता विष्णूभक्त. त्यालाही संपविण्याचा प्रयत्न राजाने अनेकदा केला. पण सतत अपयशी ठरला.         हिरण्याच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळणार नाही असे वरदान प्राप्त होते. मग चितेवर होलिकेच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवून अग्नी पेटवला. पण.. पण होलिका भस्मसात झाली अन् प्रल्हाद वाचला.         हिरण्य असे करणार हे  प्रजेला आधीच समजल्याने सर्वांनी घरोघरी अग्नी पेटवून ...