नवीन पोस्ट..

टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

इमेज
टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ? पोस्टल पत्त्यांचे आकर्षण असलेल्या पिन कोडचा काळ आता संपला आहे आणि भारतीय टपाल विभागाने पर्याय म्हणून 'डिजिपिन' नावाचा डिजिटल पत्ता सादर केला आहे. आतापासून देशातील नवीन पत्ता प्रणाली म्हणजे डिजिपिन. पारंपारिक पिन कोड विस्तृत क्षेत्र व्यापतात, तर १०-अंकी डिजिपिन प्रणाली तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान दर्शवते. पिन कोड आणि डिजिपिनमधील फरक काय आहेत ते जाणून घेऊया. भारतीय टपाल विभागाने अचूक स्थान समजून घेण्यासाठी DIGIPIN प्रणाली सुरू केली आहे. DigiPIN मध्ये 10-अंकी डिजिटल कोड आहे. पारंपारिक पिन कोडऐवजी, जो विस्तृत क्षेत्र व्यापतो, DigiPIN अचूक स्थान माहिती प्रदान करेल. म्हणजेच, या DigiPIN द्वारे तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान शोधता येते. DigiPIN तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सरकारी वेबसाइटला भेट देऊन आणि कोड शोधून तुम्ही तुमचे घर शोधू शकता. DigiPIN चा फायदा असा आहे की ते योग्य ठिकाणी पत्रव्यवहार पोहोचवेल आणि रुग्णवाहिका आणि अग्निशमन विभागांसारख्या आपत्कालीन सेवांना स्थान समजून अचूकपणे पोहोचण्या...

दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती भाग ३.

 सातवा दिवस - रंग हिरवा

 


परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायिनी. लाल रंगाशी जोडलेली असली तरीही या देवीचा आवडता रंग हिरवा समजण्यात येतो. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध या देवीने केला होता त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही नाव आहे. कालिका पुराणात ओडिसामध्ये कात्यायनी आणि भगवान जगन्नाथ यांचे स्थान सांगण्यात आले आहे. आज्ञा चक्र या दिवशी स्थित होत असून योगसाधनेत याचे महत्त्व आहे. अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती, समाधान मिळवून देण्यासाठी या देवीची महिला पूजाअर्चा करतात. त्यामुळेच हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाशी जास्त संबंधित मानला जातो.बुधाचा रंग हा हिरवा आहे. त्याचे रत्न पाचू हे देखिल हिरव्या रंगाचे आहे. म्हणून या दिवशी हिरवे वस्त्र वापरावे. बुध हा आपल्या बुद्धिचा कारक आहे तसेच तो आपल्या मामाचे प्रतिनिधित्व करतो. याच्या कृपेने आपल्या बुद्धित वाढ होते व मनुष्य ज्ञानी बनतो.


आठवा दिवस - रंग जांभळा अथवा वांगी कलर




महागौरी हे दुर्गेचे आठवे रूप असून तिचा आवडता रंग जांभळा अथवा वांगी कलर समजण्यात येतो. आयुष्यात सुंदर आणि अधिक चांगले होण्यासाठी या रंगाची निवड करण्यात येते. शांती आणि समाधानाचा हा रंग प्रतीक समजण्यात येतो. पूर्वसंचित पाप नष्ट करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. महागौरीने भगवान शिव पती मिळावे म्हणून कठोर तपस्या केली होती. या तपस्येने पार्वतीचे रूप हे सावळे होते मात्र त्यानंतर भगवान शिव पार्वतीला वरदान देऊन तिला गौर वर्ण देतात अशी आख्यायिका आहे म्हणूनच तिला महागौरी असंही नाव देण्यात आलं आहे. आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून अष्टमीच्या दिवशी या देवीची महिला आराधना आणि पूजा करतात. तसंच या दिवशी लहान मुलींचीही पूजा करण्यात येतात. त्यामुळेच प्रसन्न वातावरणासाठी हा जांभळा रंग निवडण्यात आला आहे. 



नववा दिवस - रंग मोरपिशी


नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे नवरात्री पूजेचा शेवटचा दिवस. हा दिवस मातासिद्धींना समर्पित आहे जो दुर्गा देवीचा नववा अवतार आहे. 

या दिवशी मोरपिशी रंग वापरावा ती भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी देतात. म्हणूनच तिला सिद्दत्री माता म्हणून ओळखले जाते. माता सिद्धिद्रीची इतर नावे देवी लक्ष्मी आहेत जी संपत्ती, आनंद आणि यश दर्शवितात. देवी, दुर्गा देवीचा ९ वा अवतार सिद्ध, गंधर्व, असुर, देव आणि यक्ष यांच्याद्वारे मां सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. मार्कंडेय पुराणानुसार, आठ प्रकारच्या सिध्दी आहेत, अनीमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ति, प्रकामा, इशीटवा आणि वाशिव प्रकारचे सिद्धी आहेत. पूर्ण भक्ती आणि शुद्ध अंतःकरणाने उपासना केल्यास भक्त माता सिद्धिद्रीच्या आशीर्वादाने या सर्व सिद्धि प्राप्त करू शकतात.

नवरात्रीच्या  हार्दिक शुभेच्छा.....


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

कफ व खोकला यावरील उपाय.