टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

दिवस पहिला - रंग करडा
नवरात्रीतील पहिल्या दिवशी काळरात्री देवीची आराधना करण्यात येते. याची पूजाअर्चा पापांपासून सुटका मिळावी आणि आपल्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी करण्यात येते. पहिल्या दिवशी या देवीचा जप करण्यात येतो. या दिवशीचा रंग करडा आहे. या देवीला करडा रंग प्रिय असून ही देवी दिसायला भयानक असली तरीही नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. दुष्टांचे विनाश करणारी ही देवी असून हिच्या स्मरणाने दानव, दैत्य, राक्षस, भूत, पिशाच भयभीत होतात असा समज आहे. ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठीही या देवीची आराधना केली जाते. म्हणूनच यासंबंधित करडा रंग या देवीला प्रिय आणि महत्त्वाचा मानण्यात येतो. आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी या देवीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे काळरात्रीची पूजा ही सप्तमीला करण्यात येते. नवग्रहानपैकी राहु आणी केतु या दोन ग्रहांना त्यांचा वार हा दिलेला नाही पण यांचा …परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो.यांचे रत्न हे राखाडी रंगाचे आहे. या दिवशी हा रंग वापरल्यास मानुस हा राहुपीड़ा,केतुपिडा तसेच कालसर्पपीड़ा या पासून मुक्त होऊंन मनुष्याचा क्रूर स्वभाव शांत होतो. व त्याच्या हातुन दान पुण्य होते तसेच आईचे व वडिलांचे माता पिता दोन्ही आनंदात राहतात.
दुसरा दिवस - रंग नारिंगी अर्थात भगवा
हा दिवस शैलपुत्री देवीचा मानण्यात येतो. जे दुर्गाचे पहिले रूप आहे. पर्वतराज हिमालयच्या पोटी जन्म घेतला म्हणून शैलपुत्री असे नाव ठेवण्यात आले.या देवीचा आवडता रंग नारिंगी आणि जास्वंदीचे फूल प्रिय आहे. त्यामुळे नारिंगी व भगवा रंग परिधान केल्याने शैलपुत्री प्रसन्न होते असा समज आहे. शैलपुत्री देवी भाग्य उजळवते असं म्हटलं जातं. त्यामुळे या पहिल्या दिवशी तिची पूजाअर्चा करून तिला तिचे भक्त प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. केशरी रंग हा उगवत्या सुर्याचा आहे. सूर्य हा उर्जेचा दाता आहे. तसेच तो आपल्या पित्याचे रक्षण करतो. तसेच सुर्याचा अधिकार आपल्या ह्रदयावर असतो. या दिवशी हा रंग वापरल्यास मानुस सामर्थ्यवान बनतो व हृदयपिडेचा धोका कमी होतो.
तिसरा दिवस - रंग पांढरा अर्थात सफेद
हा दिवस ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. तपस्या आचरणात आणणारी ही देवी असल्याने या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्या करावी लागते. या देवीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असते असे सांगण्यात येते. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते असं म्हटलं जातं. तप, त्याग, संयम यासाठी ही देवी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच या देवीचा आवडता रंग हा पांढरा आहे. पांढरा रंग हा आयुष्यात संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. त्यामुळे या देवीची उपासना करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे महत्त्व आहे. तसंच ही ज्ञानदेवता असल्याचेही समजण्यात येते.हा रंग चंद्राचा असून चंद्र हा शांतीचे प्रतिक आहे. चंद्र आपल्या आईचे रक्षण करतो. तसेच तो माणसाच्या मनावर त्याचे प्रभुत्व आहे.या दिवशी हा रंग वापरल्यास मानसाचे मन स्थिर व शांत होते. त्याला भरपूर प्रमाणात मित्रसुख मिळते.
नवरात्रीच्या शुभेच्छा...
दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती भाग 2दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती भाग 2
इतर माहिती आपण पुढील पोस्ट मध्ये पाहू....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️