पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

उशीजवळ फोन ठेवून झोपताय मग या समस्यांना सामोरे जायला तयार व्हा.....!

इमेज
उशीजवळ फोन ठेवून झोपताय मग या समस्यांना सामोरे जायला तयार व्हा.....! फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसभर तर फोनचा वापर सुरू असतोच; पण रात्री झोपतानाही अनेक जण सोशल मीडिया सर्फिंग करत असतात, चित्रपट किंवा सीरिज पाहत असतात. शिवाय झोपताना अनेक जण उशीजवळ फोन ठेवून झोपतात. उशीजवळ फोन ठेवून झोपणं आरोग्यासाठी चांगलं नाही. याचे शरीरावर कोणते चांगले व वाईट परिणाम होतात, ते जाणून घेऊ या. या संदर्भातलं वृत्त 'एबीपी लाइव्ह'ने दिलं आहे. बऱ्याचदा असं दिसून येतं, की जेव्हा काही जण फोन जवळ ठेवून झोपतात आणि मध्येच डोळे उघडतात तेव्हा फोन हे झोप खराब करण्याचं कारण बनतो. अनेकांना रात्री अनेक वेळा जाग येते. अशा परिस्थितीत जेव्हा ते पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना फोन वापरावासा वाटतो. मग सोशल मीडिया स्क्रोल करण्यात बराच वेळ वाया जातो. फोनचा लाइट मेंदू आणि शरीराला सिग्नल देतो, की तुमची झोपण्याची वेळ संपली आहे. यामुळे झोप उडून जाते. फोनचा आरोग्यावर परिणाम होतो का...? फोन उशीजवळ ठेवून झोपल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनबद्दल अनेक जण चिंता व्यक्त करतात; पण खरं...

पु. लं... च्या शब्दात...

इमेज
 पु. लं... च्या शब्दात .... शून्यातून विश्व,       की विश्वातून शून्य ...!!!           टू रुम किचनचा                 एखादा फ्लॅट ...                     दोन चार एकरचं                           फार्म हाऊस ...,                     एखादी चार चाकी गाडी                 आणि भौतिक वस्तूंचं            प्रदर्शन मांडता आलं, की      आपण म्हणतो ... अमक्या-तमक्यानं       शून्यातून विश्व            निर्माण केलं ....!!!                म्हणजे होतंय कांय, की                      सुख मिळेल, या आशेनं    ...