पोस्ट्स

केदारनाथ मंदिर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

जाणून घ्या अक्षय तृतीया बद्दल संपूर्ण माहिती...

इमेज
🚩🚩 जाणून घ्या अक्षय तृतीयाबद्दल संपूर्ण माहिती 🚩🚩 अक्षय तृतीया  कधी आहे अक्षय तृतीया, या दिवशी सोने खरेदी करणे का मानलं जातं शुभ, जाणून घ्या अक्षय तृतीयेची पौराणिक कहाणी      हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी बरीच शुभ कामे केली जातात. हिंदू पंचगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी साजरी केली जाते.  हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी बरीच शुभ कामे केली जातात. हिंदू पंचगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी साजरी केली जाते. या दिवशी दान-पुण्य करण्याचे विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विवाह, गृह प्रवेश, धार्मिक विधी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असा विश्वास आहे की या दिवशी सोने खरेदी केल्याने प्रगती होते. यावेळी अक्षय तृतीया 30  एप्रिल 2025 रोजी आहे . चला या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया –   महत्त्व  अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलं जाते. या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात. या दि...

बैलपोळा.

इमेज
 बैलपोळा बैलपोळा श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात.  या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “  सण येतो . शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2022 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2022 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय . खरं म्हणजे सर्व जगाचे पोट ज्या बळीराजावर अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो .  वर्षभर शेतीकामाला मदतनीस म्हणून उभा राहणारा शेतकऱ्या बरोबर राहणारा सर्जा – राजा ( बैल )  याच्या विना शेतकऱ्यांचे काम पूर्ण होत नाही अशा या रिंगी – शिंगी ,  ढवळा – पवळा , सर्जा- राजा व अशी प्रेमाने  बरीचशी ठेवलेली नावे  बैलाची असतात . अशा या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण वर्षातून एकदा येतो. व शेतकरी राजा हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरी करतो . बैलपोळा सण कसा साजरा करतात  ? | व बैल पोळा सजावट ? पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी ब...

गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व...

इमेज
  गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व...!!! गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभता पासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे.    आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते.    गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्ये करणे शुभ असते.  पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो.    साधकासाठी फायदे...

केदारनाथ मंदिर एक अद्भुत मंदिर.

इमेज
 केदारनाथ मंदिर एक न उलगडलेल कोडं ! केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.  केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणिएस स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.  /Kedarnath-temple-Information ह्या क्षेत्रात फक्त *मंदाकिनी नदीच* राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.  केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शक...