टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व
दुर्गेची नऊ रूपं अर्थात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि सिद्धीत्री यांची या दिवसात पूजाअर्चा करण्यात येते. या देवींना आवडणाऱ्या रंगांवरून नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांचे महत्त्व ठरलेले आहे. पण बरेचदा वारानुसारही रंगाची निवड करण्यात येते. *उदाहरणार्थ सात वार अनुसार रंग तसेच इतर मोरपिशी, जांभळा, आकाशी, गुलाबी.
सोमवार २६ सप्टेंबर २०२२ पहिली माळ, पांढरा रंग.
पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे.
मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ दुसरी माळ, लाल रंग.
दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.
बुधवार २८ सप्टेंबर २०२२ तिसरी माळ, निळा रंग.
तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे.
गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ चौथी माळ, पिवळा रंग.
चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग भक्तांना संतती, समृद्धी, स्नेह आणि मोक्ष चा आशीर्वाद देते.
शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ पाचवी माळ, हिरवा रंग.
पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे.
हे पण वाचा :- दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती
शनिवार १ ऑक्टोबर २०२२ सहावी माळ, करडा रंग.
सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला समर्पित आहे. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे. देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता.
रविवार २ ऑक्टोबर २०२२ सातवी माळ, नारिंगी रंग.
सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.
सोमवार ३ ऑक्टोबर २०२२ आठवी माळ, गुलाबी रंग.
आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग समृद्धी, नाविण्यता, ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
मंगळवार ४ ऑक्टोबर २०२२ नववी माळ, जांभळा रंग.
नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतिक आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️