टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

The story and significance of Holika Dahan |
आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. वर्षभर ज्याची वाट पहात असतात, ती पळसफुले सर्वत्र बहरलीत. जीवनात वसंत वाढविणारी आज होळी पौर्णिमा आली.
राजा हिरण्यकश्यपू. हिरण्य म्हणजे सोने. सोन्याच्या.. भोगाच्या.. सुखाच्या मागे लागलेला हा भोगवादी राजा. त्याने राक्षसी वृत्तीने सर्व सज्जन भगवंत भक्ताना वेठीस धरले. भगवंताचे नावही कुणी उच्चारले तर तो जीव घेऊ लागला. पण पुत्र प्रल्हाद होता विष्णूभक्त. त्यालाही संपविण्याचा प्रयत्न राजाने अनेकदा केला. पण सतत अपयशी ठरला.
हिरण्याच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळणार नाही असे वरदान प्राप्त होते. मग चितेवर होलिकेच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवून अग्नी पेटवला. पण.. पण होलिका भस्मसात झाली अन् प्रल्हाद वाचला.
हिरण्य असे करणार हे प्रजेला आधीच समजल्याने सर्वांनी घरोघरी अग्नी पेटवून प्रल्हादाच्या रक्षणासाठी अग्नी पूजन केले.. अंतःकरणपुर्वक प्रार्थना केली. मग संतुष्ट अग्नीने होलिकेचे दहन करुन भगवंतभक्त प्रल्हादाला वाचवत होलिकेला भस्मसात केले. तेव्हापासून दरवर्षी लोक भोगवादी राक्षसी प्रवृत्तीच्या विनाशासाठी घरोघरी होलिकेचे दहन करुन अग्नीचे पूजनाचा हा होलिकोत्सव साजरा करु लागले.
भारतीय संस्कृतीतील निसर्गाशी जोडलेला हा महत्त्वाचा सण. हिवाळ्यातील थंडीला दूर सारत निसर्गात पसरलेल्या रोगट जीवजंतूंचे या होळीत दहन होते. अग्नी ज्वाळातून प्रल्हादाला वाचविणाऱ्या होलिकेचे स्मरण म्हणून असूरवृत्तीच्या नाशासाठीचे हे होलीका दहन. ज्यामध्ये राग.. व्देष.. मत्सर.. अहंकार या असूरांचे.. शत्रूचे दहन करायचे. मग जीवन आनंदीच.
निसर्गरम्य हिरव्यागार कोकणात शिमगोत्सवाचा आनंद कोकणवासी पूढील १५ दिवस लुटणार. ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येणार. या पालखीच्या स्वागताला घराच्या भिंती सारवलेल्या आहेत. अंगणी रंगीबेरंगी रांगोळी काढणाऱ्यां भगिनींची लगबग सुरू आहे. पैठणी परिधान करुन नटूनथटून सौभाग्यलंकारासह त्या ग्रामदेवतेचे पूजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य त्याला दाखवणार. तर पुरुषमंडळी पालखी नाचविण्याचा आनंद लुटणार. या सणाचा आनंद सारेच चाकरमानी अनुभवणार.
ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग, फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि
दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच 'शिमगा' असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते
आले रे आले रंगवाले, आले रे आले रंगवाले.. !!
होळी रे होळी....पुरणाची पोळी.. !!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️