टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

![]() |
वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा |
वड, पिंपळ, औदुंबर, शमी हे यज्ञीय व पवित्र वृक्ष म्हणून सांगितले आहेत. यांच्या पूजनाने आपण निसर्गाच्या जवळ जात असतो. झाडे लावणे जितके महत्त्वाचे त्यापेक्षा त्यांची जोपासना करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. हा संदेश सध्याच्या काळाच्या दृष्टीने या व्रतातून मिळतो. सर्व वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त आहे. पारंब्यांनी त्याचा विस्तारहि खूप होतो. अशा वटवृक्षात असणाऱ्या ब्रह्मासावित्री या देवतांचे पूजन करून मला व पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य, धनधान्य व मुले, नातू यांनी प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी श्रद्धेने मागणी या व्रताच्या संकल्पात केली जाते. सौभाग्य नको असे म्हणणारी स्त्री भूतकाळात झाली नाही व भविष्यकाळातहि होणार नाही. 'आमचा संसार उत्तम व सुखाचा व्हावा, मुले, नातवांनी घराचे गोकुळ व्हावे हा आनंद मिळावा, असे कोणाला वाटणार नाही? हे व्हावे हाच या व्रताचा हेतू आहे. व्रताच्या आरंभी संकल्प केला जातो. हे व्रत मी का करीत आहे, याचा उद्देश व हेतु काय आहे याचे प्रकटीकरण संकल्पात होत असते. संकल्प म्हणजे हेतूचे प्रकटीकरण आहे.
हे वटसावित्रीचे व्रत सुवासिनी स्त्रिया अतिशय श्रद्धेने व निष्ठेने करतात. सावित्रीची कथा वाचली असता लक्षात येते की, सावित्रीच्या गळ्यात सत्यवान बांधला नव्हता. उलट सत्यवान हा दरिद्री व अल्पयुषी आहे. असे नारदांनी तिच्या लग्नापूर्वी सांगितले होते. म्हणून कुटुंबातील सर्वांची इच्छा तिने सत्यवानाशी लग्न करू नये, अशीच होती. शिवाय सत्यवान काही राजा नव्हता किंवा धनवानही नव्हता. उलट सावित्री ही अश्वपति राजाची मुलगी म्हणजे राजकन्या होती, असे असूनही "मनाने मी सत्यवानाला वरले आहे व मी त्याच्याशीच विवाह करणार” असे तिने स्पष्टपणे सांगितले. स्वेच्छेनेच तिने सत्यवानाशी विवाह करण्याचे ठरविले होते. महान पतिव्रतेत सावित्रीची गणना केली जाते. ती प्रातः स्मरणीय आहे. जीवनातील खऱ्या यशासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा तेजस्वी आदर्श सावित्री आपल्यापुढे ठेवते. स्वेच्छेने च जाणीवपूर्वक निवडलेल्या पतीच्या सुखदुःखात भागीदार होणे, त्याला संकटातून वाचविण्यासाठी काळालाही आव्हान देण्याची तयारी ठेवणे, त्याची साथ न सोडणे हे स्त्रीचे फार मोठे सद्गुण आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️