पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

बैलपोळा.

इमेज
 बैलपोळा बैलपोळा श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात.  या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “  सण येतो . शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2022 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2022 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय . खरं म्हणजे सर्व जगाचे पोट ज्या बळीराजावर अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो .  वर्षभर शेतीकामाला मदतनीस म्हणून उभा राहणारा शेतकऱ्या बरोबर राहणारा सर्जा – राजा ( बैल )  याच्या विना शेतकऱ्यांचे काम पूर्ण होत नाही अशा या रिंगी – शिंगी ,  ढवळा – पवळा , सर्जा- राजा व अशी प्रेमाने  बरीचशी ठेवलेली नावे  बैलाची असतात . अशा या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण वर्षातून एकदा येतो. व शेतकरी राजा हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरी करतो . बैलपोळा सण कसा साजरा करतात  ? | व बैल पोळा सजावट ? पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी ब...

तारुण्य पिटीका,मुरुमवांग,डोळ्याखाली काळी वर्तुळ यावरील उपाय

इमेज
 तारुण्य पिटीका,मुरुमवांग,डोळ्याखाली काळी वर्तुळ यावरील उपाय काॅलेजमधील प्रत्येक तरुण तरुणींची इच्छा असते आपण सुंदर दिसावे,आपला चेहरा काळे डाग,पिंपल विरहीत असावा जेणेकरुन आपले व्यक्तीमत्व आकर्षक दिसावे. ◾तारुण्यास सुरु होणारा हा त्रास आहे त्यास तारुण्यपिटीका , पिंपल असे म्हणतात.या वयात शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात.त्याचा परीणाम व खाण्यातील बदल यामुळे चेहर्यावर मुरुम पुटकुळ्या यायला लागतात. आंबट,मसालेदार,उष्ण ,खारट,विदाही यांसारख्या रक्तदुष्टीकर आहाराने पिंपल वाढायला लागतात. तरुणांमध्ये पाणीपुरी ,भेळ,मसालेदार पदार्थांची आवड ही जास्त असते.अभ्यासामूळे रात्री जागरण होते.यामुळे रक्ताचे गुणधर्म बिघडतात. ◾अनेक जण पिंपलसाठी बाजारातील खुप क्रीम वापरुन बघतात पण जोपर्यंत रक्तशुध्दी होत नाही तोपर्यंत कायमचा आराम मिळत नाही.विरेचन व रक्तमोक्षण या पंचकर्मांनी रक्त शुध्द होऊन पिंपल चा त्रास कमी होतो.रक्त शुध्दी झाली की शरीराचा वर्ण सुधारायलाही मदत होते.वारंवार होणार्या त्रासाचा हा कायमचा उपाय होय.पथ्य-खाण्यामध्ये सात्वीक आहार,ताजी फळे,मनुका,डाळिंब ,पचायला हलका आहार घ्यावा. सोरायसीस,इसब,...

कफ व खोकला यावरील उपाय.

इमेज
कफ व खोकला यावरील उपाय.         वातावरणातील बदला मुळे अनेकांची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली आहे व त्या मुळे सर्दी, खोकला कफ होत आहे. ह्या साठी उपाय             कफ व खोकला यावरील उपाय. उपाय ----- १) ज्येष्ठ मधाचा तुकडा + २ काळीमिरी + थोडी खडीसाखर तोंडात ठेऊन लाळ गिळत राहावी. दिवसातून २/३ वेळ. २) एक कप गरम गरम पाणी चहा प्रमाणे बशीतून प्या. दिवसातून २ / ३ वेळ. कफ लवकर पातळ होतो. ३) उज्जाई प्राणायाम (घसा टाईट) करा. ४) हळद + मध + आलं रस घ्या. ५) आम्लपित्त होऊन देवू नका. झाल्यास आवळा पदार्थ / काळी मनुका / आले योग्य प्रमाणात खाणे. ६) जास्त आंबट, तेलकट पदार्थ खाऊ नका. ७) एक लवंग चघळा. किंवा बडीशेप खा. ८) प्राणायाम व ऑक्युप्रेशर करा. श्वास रोखून शारीरिक हालचाली करा.   ९) १ लवंग + २ काळीमिरी + थोडी खडीसाखर तोंडात ठेऊन लाळ गिळत राहावी. खोकला लगेच थांबतो. १०) पोट साफ राहू द्या.  रात्री झोपतांना कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण सेवन करा  ११) हाताप...

पेरूच्या पानांचा औषधि उपयोग...

इमेज
  पेरूच्या पानांचा औषधि उपयोग... १). पेरूचि पाने जंतूनाशक असल्याने, दातात किड झालि असता, व हिरड्या सूजल्या असतील तर, रक्त येत असेल तर, पाने पाण्यात उकळवून मग याच्या गुळण्या कराव्या. आराम पडतो. २) पेरुचि पाने वाटुन याचा रस घेतल्यास तीव्र ज्वर उतरतो, उलट्या मळमळ होत असल्यास याचा काढा करून प्यावा.. ३) चेहर्यारवरच्या सुरकुत्या घालवण्यासाठि, कोवळिपाने  वाटून याचा लेप द्यावा, नंतर धुवा. हळूहळू सुरकुत्या जातात. तसेच याच्या उ कळून थंड केलेल्या पाण्याने      चेहरा धुतल्यास सुंदर, मुलायम, तजेलदार होतो. ४) स्रियांना मासिक धर्माचा काहि त्रास असल्यास, श्वेतप्रदर, रक्तप्रदर असल्यास, रोज सकाळ, संध्याकाळ याच्या पानांचा रस नियमित घ्यावा. रोग दूर होतात. ५) शरिरात विविध कारणांनि झालेल्या गाठिंवरिल उपाय म्हणूनहि पेरूच्या पानांचा वापर केला जातो. दुखणार्या गाठिंवर पेरूच्या पानांचि पेस्ट लावून ठेवलि तर आलेलि सूज व दूःख दूर होते.. ६) मधुमेहात वाढलेलि शर्करा कमि करण्यासाठि याचि पाने खुपच उपयोगि आहेत. रोज सकाळी अनशापोटि  कोवळ्या पानांचा रस अर्धा कप घ्यावा. रक्तशर्करा नियंत्...

भारत रत्न पुरस्कार प्राप्त सन्मानित व्यक्तींची यादी

इमेज
       भारत रत्न पुरस्कार प्राप्त सन्मानित       व्यक्तींची यादी :- ०१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) ०२. चक्रवर्ती राजगोपालचारी (१९५४) ०३. डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१९५४) ०४. डॉ. भगवान दास (१९५५) ०५. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१९५५) ०६. जवाहरलाल नेहरू (१९५५) ०७. गोविंद वल्लभ पंत (१९५७) ०८. धोंडो केशव कर्वे (१९५८) ०९. डॉ. बिधान चंद्र रॉय (१९६१) १०. पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) ११. डॉ. राजेंद्र प्रसाद (१९६२) १२. डॉ. झाकिर हुसेन (१९६३) १३. पांडुरंग वामन काणे (१९६३) १४. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर-१९६६) १५. इंदिरा गांधी (१९७१) १६. वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) १७. के. कामराज (मरणोत्तर - १९७६) १८. मदर तेरेसा (१९८०) १९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर-१९८३) २०. खान अब्दुल गफार खान (१९८७) २१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर-१९८८) २२. डॉ.आंबेडकर (मरणोत्तर-१९९०) २३. नेल्सन मंडेला (१९९०) २४. राजीव गांधी (मरणोत्तर -१९९१) २५. सरदार पटेल (मरणोत्तर-१९९१) २६. मोरारजी देसाई (१९९१) २७. मौलाना आझाद (मरणोत्तर-१९९२) २८. जे.आर.डी. टाटा (१९९२) २९. सत्यजित रे (१९९२) ३०. डॉ....

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात

इमेज
भारतरत्न पुरस्काराची सुरुवात सुरुवात - २ जानेवारी १९५४ भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २ जानेवारी १९५४ रोजी झाली. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. क्रीडा, साहित्य, कला, विज्ञान, सेवा, शांती, उद्योग इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना भारत सरकार तर्फे देण्यात येतो. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. २०१४ मध्ये साहित्य, कला, विज्ञान, सेवा, शांती, उद्योग क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले.  आतापर्यंत ४८ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. पहिला भारतरत्न पुरस्कार हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना २ फेब्रुवारी १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्‍न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांच...