नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

कफ व खोकला यावरील उपाय.

कफ व खोकला यावरील उपाय.


        वातावरणातील बदला मुळे अनेकांची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली आहे व त्या मुळे सर्दी, खोकला कफ होत आहे. ह्या साठी उपाय

         https://mimarathibana.blogspot.com/2020/12/Remedy-for-cough-and-phlegm-in-Marathi.html


  कफ व खोकला यावरील उपाय.


उपाय -----


१) ज्येष्ठ मधाचा तुकडा + २ काळीमिरी + थोडी खडीसाखर तोंडात ठेऊन लाळ गिळत राहावी. दिवसातून २/३ वेळ.


२) एक कप गरम गरम पाणी चहा प्रमाणे बशीतून प्या. दिवसातून २ / ३ वेळ. कफ लवकर पातळ होतो.


३) उज्जाई प्राणायाम (घसा टाईट) करा.


४) हळद + मध + आलं रस घ्या.


५) आम्लपित्त होऊन देवू नका. झाल्यास आवळा पदार्थ / काळी मनुका / आले योग्य प्रमाणात खाणे.


६) जास्त आंबट, तेलकट पदार्थ खाऊ नका.


७) एक लवंग चघळा. किंवा बडीशेप खा.


८) प्राणायाम व ऑक्युप्रेशर करा. श्वास रोखून शारीरिक हालचाली करा.  


९) १ लवंग + २ काळीमिरी + थोडी खडीसाखर तोंडात ठेऊन लाळ गिळत राहावी. खोकला लगेच थांबतो.




Cough syrup  कफ व खोकला यावरील उपाय.

१०) पोट साफ राहू द्या. 

रात्री झोपतांना कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण सेवन करा 


११) हातापायांचे तळवे घासा व प्रेस करा.


१२) नाकात देशी गाईचे तुप टाका.


१३) गुळ खा मात्र तासभर पाणी पिऊ नका.


१४) जास्तच कफ वाढला असेल तर आहारात मध / आले / सुंठ व गुळाचा वापर वाढवा.


१५) टाकणखाराचे चूर्ण मधातून चाटणे. कफ पातळ होतो.


१६) अडुळसा पानांचा रस + मध टाकून घेणे.


१७) आले रस १ चमचा + मध १ चमचा ३ वेळा घेणे.


१८) जेवणात कच्चा कांदा खाणे.


१९) गरम दूध + हळद घेणे.


२०) सुचना --- सर्वच उपाय एकाच वेळी करू नका. कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जास्त व जोरदार व्यायाम करू नये. 3-4 दिवसात कफ व खोकला बरा न झाल्यास MBBS डॉ च्या सल्ल्याने औषध उपचार करा

*हि माहिती आपल्याला माहिती साठी देत आहोत.
कृपया वरील उपाय हे डॉक्टर च्या सल्ला घेऊन करावे. काही अपाय झाल्यास MiMarathibana&Team जबाबदार राहणार नाही..

Comment करा Follow करा आणि शेअर करायला विसरू नका...
धन्यवाद..



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत