टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २ जानेवारी १९५४ रोजी झाली.
१९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्न’ देण्याची सोय करण्यात आली.
२०१४ मध्ये साहित्य, कला, विज्ञान, सेवा, शांती, उद्योग क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले.
आतापर्यंत ४८ जणांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो.
१९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.
'भारतरत्न’ मेडल ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते. हे कासे धातूचे बनवलेले असते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सें.मी. व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, ज्याच्या खाली देवनागरी लिपी मध्ये ‘भारतरत्न’ कोरलेले असते.
मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते.
आता आपण भारतरत्न पुरस्कार ची माहिती पाहिली .पण भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती ची यादी साठी येथे क्लिक करा..
Link.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️