पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

बैलपोळा.

इमेज
 बैलपोळा बैलपोळा श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात.  या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “  सण येतो . शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2022 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2022 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय . खरं म्हणजे सर्व जगाचे पोट ज्या बळीराजावर अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो .  वर्षभर शेतीकामाला मदतनीस म्हणून उभा राहणारा शेतकऱ्या बरोबर राहणारा सर्जा – राजा ( बैल )  याच्या विना शेतकऱ्यांचे काम पूर्ण होत नाही अशा या रिंगी – शिंगी ,  ढवळा – पवळा , सर्जा- राजा व अशी प्रेमाने  बरीचशी ठेवलेली नावे  बैलाची असतात . अशा या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण वर्षातून एकदा येतो. व शेतकरी राजा हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरी करतो . बैलपोळा सण कसा साजरा करतात  ? | व बैल पोळा सजावट ? पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी ब...

ध्यान (मेडीटेशन) पासून मानसिक व शारीरिक फायदे | Benefits of Meditation

इमेज
    ध्यान (मेडीटेशन) पासून मानसिक व शारीरिक फायदे Meditation  मन:शांती, आनंद, आरोग्य, तणाव मुक्तता, चिंतामुक्ती अस खूप काही आपल्याला हवे असते. पण ते कुठे आणि कसे मिळेल हे मात्र माहिती असूनही आपण ते करत नाही. ध्यान जगण्याचे महत्वाचे कार्य म्हणून करायला हवे. ध्यान करत असताना आपण स्वतः सोबत संवाद करत असतो आणि तो संवाद निशब्द असतो. मग आपण स्वतः म्हणजे कोण तर आपला श्वास. हो हा श्वास म्हणजे आपण. आणि हा देह इतरांसाठी आपली ओळख. आनंद, आरोग्य श्वासात दडलेले आहे. आयुष्य जगत असताना आपणच मागे डोकावून बघा कितीदा स्वतः सोबत तुम्ही संवाद साधला आहे. नाही आठवत ना.              अहो आपण सकाळी उठलो की हा देह ठीक ठाक ठेवण्यासाठी नको ते उपाय करतो. पण जो तुमच्यात तुम्ही म्हणून आहात त्याचे काय. त्याची काळजी घेता का. ते मन जे हा देह चालवत असते. त्याचे काय. स्वतःचा विसर क्षणो क्षणी पडतोना.... किती चिंतन, विचार, काळजी, तान तनाव असा त्रासदायक फास मनाच्या भोवताली असतो. कमीत कमी थोडा वेळ देऊन तो त्रास बाजूला ठेऊन स्वतःला म्हणजे मनाला मोकळे करू नाही का वाटत? चला तर मग ...

दसऱ्या चे मराठी एस एम एस

इमेज
दसऱ्या चे मराठी एस एम एस

Dussehra SMS in English

इमेज
  Dussehra SMS in English Soneri Kirane… Soneri Kiranancha…. Soneri Diwas…. Soneri Diwasachya… Soneri Shubhechchha…. Keval…. Sonyasarkhya Lokanna….! Happy Dasara….! Dussehra leaf Marathi Asmitechi Mrathi shan “Marathi parmprecha marathi man” Aaj sonyasarkha diwas gheun yeyil aayushya tumchya sukh aani samudhi “Happy Dassehra,”

दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती भाग ३.

इमेज
 सातवा दिवस - रंग हिरवा   परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायिनी. लाल रंगाशी जोडलेली असली तरीही या देवीचा आवडता रंग हिरवा समजण्यात येतो. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध या देवीने केला होता त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही नाव आहे. कालिका पुराणात ओडिसामध्ये कात्यायनी आणि भगवान जगन्नाथ यांचे स्थान सांगण्यात आले आहे. आज्ञा चक्र या दिवशी स्थित होत असून योगसाधनेत याचे महत्त्व आहे. अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती, समाधान मिळवून देण्यासाठी या देवीची महिला पूजाअर्चा करतात. त्यामुळेच हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाशी जास्त संबंधित मानला जातो.बुधाचा रंग हा हिरवा आहे. त्याचे रत्न पाचू हे देखिल हिरव्या रंगाचे आहे. म्हणून या दिवशी हिरवे वस्त्र वापरावे. बुध हा आपल्या बुद्धिचा कारक आहे तसेच तो आपल्या मामाचे प्रतिनिधित्व करतो. याच्या कृपेने आपल्या बुद्धित वाढ होते व मनुष्य ज्ञानी बनतो. आठव...

दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती भाग 2

इमेज
 चौथा दिवस - रंग लाल चंद्रघंटा देवीचा हा रंग मानण्यात आला आहे.या दिवशी विग्रह पूजन आणि आराधना करण्यात येते. मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होण्यासाठी भक्त या देवीची आराधना करतात. देवी चंद्रघंटेच्या कृपेने अलौलिक शक्तीचे दर्शन मिळते, तसेच दिव्यदृष्टींचा अनुभव घेता येतो असे सांगण्यात येते. या देवीची पूजाअर्चा करताना दिव्य ध्वनी ऐकायला येतात असंही सांगितलं जातं. या देवीचा आवडता रंग आहे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तीरसात राहण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व जाणलं जातं. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या तिसऱ्या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं. या देवीच्या कपाळाचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे असल्यामुळेच या देवीला चंद्रघंटा देवी नावाने ओळखलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या देवीला हा रंग प्रिय असल्याचे समजण्यात येते.   पाचवा दिवस - रंग रॉयल ब्लू अर्थात गडद निळा  पाचवे रूप- कुष्मांडा. जीला गडद निळा रंग जवळचा आहे म्हणून चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्र घालावीत. दुष्कर्म करणाऱ्या आणि राक्षसी शक्तीचा नाश करण्यास...

दुर्गेची नऊ रूपं आणि रंग यांची माहिती भाग १

इमेज
 दिवस पहिला - रंग करडा नवरात्रीतील  पहिल्या दिवशी काळरात्री देवीची आराधना करण्यात येते. याची पूजाअर्चा पापांपासून सुटका मिळावी आणि आपल्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी करण्यात येते. पहिल्या दिवशी या देवीचा जप करण्यात येतो. या दिवशीचा रंग करडा आहे. या देवीला करडा रंग प्रिय असून ही देवी दिसायला भयानक असली तरीही नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. दुष्टांचे विनाश करणारी ही देवी असून हिच्या स्मरणाने दानव, दैत्य, राक्षस, भूत, पिशाच भयभीत होतात असा समज आहे. ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठीही या देवीची आराधना केली जाते. म्हणूनच यासंबंधित करडा रंग या देवीला प्रिय आणि महत्त्वाचा मानण्यात येतो. आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी या देवीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे काळरात्रीची पूजा ही सप्तमीला करण्यात येते. नवग्रहानपैकी राहु आणी केतु या दोन ग्रहांना त्यांचा वार हा दिलेला नाही पण यांचा …परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो.यांचे रत्न हे राखाडी रंगाचे आहे. या दिवशी हा रंग वापरल्यास मानुस हा राहुपीड़ा,केतुपिडा तसेच कालसर्पपीड़ा या पासून मुक्त होऊंन मनुष्याचा क्रूर स्वभाव शांत ह...

नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व 2022

इमेज
        नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व    दुर्गेची नऊ रूपं अर्थात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि सिद्धीत्री यांची या दिवसात पूजाअर्चा करण्यात येते. या देवींना आवडणाऱ्या रंगांवरून नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांचे महत्त्व ठरलेले आहे. पण बरेचदा वारानुसारही रंगाची निवड करण्यात येते. *उदाहरणार्थ सात वार अनुसार रंग तसेच इतर मोरपिशी, जांभळा, आकाशी, गुलाबी. सोमवार २६ सप्टेंबर २०२२ पहिली माळ , पांढरा रंग. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे. मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ दुसरी माळ, लाल रंग. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. बुधवार २८ सप्टेंबर २०२२ तिसरी माळ, निळा रंग . तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे. गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ चौथी माळ, पिवळा रंग. चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग भक्...