टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

ध्यान (मेडीटेशन) पासून मानसिक व शारीरिक फायदे
Meditation
चला तर मग ध्यानाचे फायदे पाहूया....
![]() |
ध्यानाचे फायदे |Benefits Of Medition. |
* ध्यानामुळे मिळणारा आराम गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आराम जितका जास्त गहन, काम तितकेच जास्त गतिशील.
* ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. ह्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते आणि उत्साह वाढतो.
* उच्च रक्तदाब कमी होतो. रक्तातील लॅक्टिक अॅसिडची मात्रा कमी होऊन उगीचच भीती वाटणे असा त्रास होत नाही. मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी (जसे डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी) कमी होतात. सेरोटोनीन निर्मिती वाढते, ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. एक आंतरिक शक्ती स्त्रोत मिळतो.
* ध्यानामुळे मेंदू लहरी “अल्फा स्थितीत” येतात ज्यामुळे रोग-निवारणाची नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते. मन ताजे, मृदू आणि सुंदर होते.
* एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते आणि मनाचा विस्तार होतो. तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल होतो. त्यामुळे परिपूर्णता येण्यास मदत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️