टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

उशीजवळ फोन ठेवून झोपताय मग या समस्यांना सामोरे जायला तयार व्हा.....!
फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसभर तर फोनचा वापर सुरू असतोच; पण रात्री झोपतानाही अनेक जण सोशल मीडिया सर्फिंग करत असतात, चित्रपट किंवा सीरिज पाहत असतात. शिवाय झोपताना अनेक जण उशीजवळ फोन ठेवून झोपतात. उशीजवळ फोन ठेवून झोपणं आरोग्यासाठी चांगलं नाही. याचे शरीरावर कोणते चांगले व वाईट परिणाम होतात, ते जाणून घेऊ या. या संदर्भातलं वृत्त 'एबीपी लाइव्ह'ने दिलं आहे.
बऱ्याचदा असं दिसून येतं, की जेव्हा काही जण फोन जवळ ठेवून झोपतात आणि मध्येच डोळे उघडतात तेव्हा फोन हे झोप खराब करण्याचं कारण बनतो. अनेकांना रात्री अनेक वेळा जाग येते. अशा परिस्थितीत जेव्हा ते पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना फोन वापरावासा वाटतो. मग सोशल मीडिया स्क्रोल करण्यात बराच वेळ वाया जातो. फोनचा लाइट मेंदू आणि शरीराला सिग्नल देतो, की तुमची झोपण्याची वेळ संपली आहे. यामुळे झोप उडून जाते.
फोनचा आरोग्यावर परिणाम होतो का...?
फोन उशीजवळ ठेवून झोपल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनबद्दल अनेक जण चिंता व्यक्त करतात; पण खरंच त्यात काही तथ्य आहे का?
स्मार्टफोन अँटेनाच्या नेटवर्कद्वारे रेडिओ लहरी प्रसारित करून कम्युनिकेशन सोयीचं करतात. या रेडिओ लहरींना रेडिओ फ्रिक्वेन्सी लहरी असंदेखील म्हणतात. त्या लहरी म्हणजे प्रत्यक्षात एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आहे. NTPने स्मार्टफोन जवळ ठेवण्याचे काय परिणाम होतात, याबाबत अभ्यास केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️