टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.
केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणिएस स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.
![]() |
/Kedarnath-temple-Information |
सन २०१३ मध्ये केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे *सरासरी पेक्षा ३७५% जास्त* पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल *५७४८ लोकांचा जीव गेला* (सरकारी आकडे). *४२०० गावाचं नुकसान* झालं. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.
![]() |
*अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया* यांच्या मते ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडीट मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. *IIT मद्रास* ने मंदिरावर *NDT टेस्टिंग* करुन बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे. दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय *शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक* पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर *सर्वोत्तम* असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात ? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळं वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही. तिकडे हे मंदिर दिमाखात उभ आहे आणि नुसतं उभं नाही तर अगदी मजबुत आहे. ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधल गेलं आहे. ज्या जागेची निवड केली गेली आहे. ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं असं आजच विज्ञान सांगतं आहे.
हे मंदिर उभारताना *उत्तर–दक्षिण* असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर ही *पूर्व–पश्चिम* अशी असताना केदारनाथ *दक्षिणोत्तर* बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर *पूर्व-पश्चिम* असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं. पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही मग फक्त कल्पना करा की ते दगड तीथंपर्यंत वाहून नेलाच कसा असेल ? एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रांसपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती. या दगडाची विशेषता अशी आहे कि वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या *प्रोपर्टीजमध्ये* फरक झालेला नाही. त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता *एशलर* पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड विटा घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून नेलं पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले. ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअरलिफ्ट केलं होतं.
श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. Titanic जहाज बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना NDT टेस्टिंग आणि तपमान कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याच ज्वलंत उदाहरणं नाही का ? काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरुन उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ फूट वर ८५ फूट उंच, १८७ फूट लांब, ८० फूट रुंद मंदिर उभारताना त्याला तब्बल १२ फूटाची जाड भिंत आणि ६ फूटाच्या उंच प्लॅटफोर्मची मजबूती देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय.
आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने १२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवरच
असा मान मिळवणार केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण नतमस्तक🙏 होतो.
वैदिक हिंदू धर्म-संस्कृती किती प्रगत होती याचे हे एक उदाहरण आहे, त्याकाळी वास्तुशास्त्र, हवामानशास्त्र,अंतराळ शास्त्र,आयुर्वेद शास्त्र यात आपले ऋषी अर्थात शास्त्रज्ञ यांनी खुप मोठी प्रगती केली होती.म्हणूनच मला मी "हिंदु"असल्याचा अभिमान वाटतो.
Comment करा Follow करा आणि शेअर करायला विसरू नका...
छान माहिती Keep posting
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाखुप छान माहीती।
उत्तर द्याहटवा