पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

बैलपोळा.

इमेज
 बैलपोळा बैलपोळा श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात.  या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “  सण येतो . शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2022 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2022 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय . खरं म्हणजे सर्व जगाचे पोट ज्या बळीराजावर अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो .  वर्षभर शेतीकामाला मदतनीस म्हणून उभा राहणारा शेतकऱ्या बरोबर राहणारा सर्जा – राजा ( बैल )  याच्या विना शेतकऱ्यांचे काम पूर्ण होत नाही अशा या रिंगी – शिंगी ,  ढवळा – पवळा , सर्जा- राजा व अशी प्रेमाने  बरीचशी ठेवलेली नावे  बैलाची असतात . अशा या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण वर्षातून एकदा येतो. व शेतकरी राजा हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरी करतो . बैलपोळा सण कसा साजरा करतात  ? | व बैल पोळा सजावट ? पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी ब...

श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आणि माहिती

इमेज
श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आणि माहिती उत्सवाची परंपरा:- चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात..  श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन,कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन...

गुढीपाडव्याला श्रीखंड का खावे?.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध

इमेज
गुढीपाडव्याला श्रीखंड का खावे  ?.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध गुढीपाडव्याला श्रीखंड का खावे?.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली जाते. बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते... असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी.. म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो... या दिवशी गुढीला श्रीखंड पुरी चा नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया.  आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्...