पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

बैलपोळा.

इमेज
 बैलपोळा बैलपोळा श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात.  या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “  सण येतो . शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2022 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2022 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय . खरं म्हणजे सर्व जगाचे पोट ज्या बळीराजावर अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो .  वर्षभर शेतीकामाला मदतनीस म्हणून उभा राहणारा शेतकऱ्या बरोबर राहणारा सर्जा – राजा ( बैल )  याच्या विना शेतकऱ्यांचे काम पूर्ण होत नाही अशा या रिंगी – शिंगी ,  ढवळा – पवळा , सर्जा- राजा व अशी प्रेमाने  बरीचशी ठेवलेली नावे  बैलाची असतात . अशा या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण वर्षातून एकदा येतो. व शेतकरी राजा हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरी करतो . बैलपोळा सण कसा साजरा करतात  ? | व बैल पोळा सजावट ? पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी ब...

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

इमेज
 शिंगाडा... Water caltrop  शिंगाडा१२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत   बाजारात शिंगाडे दिसतात, तशिहि सर्वच हंगामि भाज्या व फळे यांचि रेलचेल असतेच ,, त्यासोबत सोने पे सुहागा असल्यासारखे शिंगाडे स्वास्थ व्रूद्धि करतात शिजवलेल्या शिंगाड्यां पेक्षा कच्चे हिरवे शिंगाडे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे शरीराला अतिशय ताकद देणारे हे फळ आहे, विटामिन ए, सी, मैंगनिज, थायमाईन, कार्बोहायड्रेट, टँनिन, सायट्रिक अँसिड, रिबोफ्लेविंन, प्रोटिन, निकोटेनिक एसिड, बीटा एमिलेज, अश्या सम्रुद्ध पोषक तत्वाने भरलेले आहे.                        शिंगाडा   शिंगाडे खाण्याचे फायदे 1) मूळव्याधिचा त्रास असल्यास शिंगाडे फायदेशिर आहे. 2) दम्याच्या रूग्णाने याचे सेवन करावे म्हणजे दम्याचा त्रास कमी होतो 3)शिंगाडा खाल्याने तळपायाच्या भेगा भरून येतात 4) शरिराच्या एखाद्या भागावर सूज आल्यास, शिंगाड्याचा लेप लावावा 5) शिंगाड्यात कँलशिअम मुबलक असल्याने हाडे व दात बळकट होतात 6) गर्भवति स्रिने शिंगाडा खाल्यास तिचे व बाळाचे स्वास्थ उ...

केदारनाथ मंदिर एक अद्भुत मंदिर.

इमेज
 केदारनाथ मंदिर एक न उलगडलेल कोडं ! केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.  केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणिएस स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.  /Kedarnath-temple-Information ह्या क्षेत्रात फक्त *मंदाकिनी नदीच* राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.  केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शक...