पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

बैलपोळा.

इमेज
 बैलपोळा बैलपोळा श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात.  या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “  सण येतो . शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2022 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2022 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय . खरं म्हणजे सर्व जगाचे पोट ज्या बळीराजावर अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो .  वर्षभर शेतीकामाला मदतनीस म्हणून उभा राहणारा शेतकऱ्या बरोबर राहणारा सर्जा – राजा ( बैल )  याच्या विना शेतकऱ्यांचे काम पूर्ण होत नाही अशा या रिंगी – शिंगी ,  ढवळा – पवळा , सर्जा- राजा व अशी प्रेमाने  बरीचशी ठेवलेली नावे  बैलाची असतात . अशा या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण वर्षातून एकदा येतो. व शेतकरी राजा हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरी करतो . बैलपोळा सण कसा साजरा करतात  ? | व बैल पोळा सजावट ? पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी ब...

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

इमेज
कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते? वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।   याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर. Why-is-Shri-Ganesha-worshiped-at-work-in-Marathi कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते? गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात. श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ...